Sunil Gavaskar: अहंकार बाजूला ठेवा, परिस्थितीचा आदर राखा! सुनील गावसकर यांनी टोचले भारतीय संघातील फलंदाजांचे कान
Sunil Gavaskar’s Strong Remarks on Indian Batting: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० विश्वकरंडक सामन्यातील पराभवानंतर सुनील गावसकर यांनी भारतीय फलंदाजांवर कडक शब्दांत टीका केली.
अहमदाबाद : अति आक्रमक फलंदाजीचा अहंकार बाजूला ठेवा, समोर असलेल्या परिस्थितीचा आदर करा. टी-२० म्हणजे प्रत्येक चेंडूवर आक्रमण हे फाजील आत्मविश्वास बाळगू नका अशा शब्दात महान फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय संघाचे कान टोचले आहेत.