
Sunil Gavaskar Explains Reason Behind Karun Nair Not Selected in Team India : भारतीय क्रिकेटपटू करूण नायरने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत लक्षणीय कामगिरी केली. त्याने स्पर्धेतील ९ सामन्यांत ३८९.५० च्या सरासरीने ७७९ धावा केल्या. ज्यामध्ये ५ शतकं व एका अर्धशतकाचा समावेश होता. नायरची लिस्ट ए क्रिकेटमधील कामगिरी पाहाता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याची निवड होईल असी शक्यता होती.
BCCI निवड समिती संघाचामधये त्याच्या नावाचा विचार करत आहे अशा बातम्या देखील समोर आल्या होत्या. पण शनिवारी अजित आगरकर व रोहित शर्माने जाहीर केलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात करूणचा समावेश नव्हता. यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली.