Sunil Gavaskarsakal
Cricket
Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन
Wankhede Stadium: मुंबई क्रिकेट संघटनेच्या संग्रहालयाच्या उद्घाटनावेळी सुनील गावसकर यांनी ‘क्रिकेटमध्ये कायमच विद्यार्थी राहावे लागते’ असे मत व्यक्त केले. वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार आणि गावसकर यांच्या पुतळ्यांचे अनावरणही झाले.
मुंबई : कितीही नाव कमावले आणि अनुभव पाठीशी असला तरी क्रिकेटमध्ये प्रत्येक जण कायमच विद्यार्थी असतो, कोणीही मास्टर नसतो, असे अनुभवाचे बोल महान फलंदाज सुनील गावसकर यांनी जाहीरपणे बोलून दाखवले. निमित्त होते मुंबई क्रिकेट संघटनेच्या संग्रहालयाच्या उद्घाटनाचे. स्वतःच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर गावसकर भावूक झाले, आपल्याकडे शब्द नसल्याचेही ते म्हणाले.