Sunil Gavaskar Asia Cup 2025 Playing XI prediction : भारताचा १५ सदस्यीय संघ आशिया चषक स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताला अ गटात संयु्क्त अरब अमिराती, ओमान व पाकिस्तान यांचा सामना करावा लागणार आहे. ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत यूएई येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठीचा भारतीय संघ मंगळवारी निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी जाहीर केला. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळेल, याची उत्सुकता लागली आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी आशिया चषक स्पर्धेतील त्यांची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.