Suresh Raina’s all-time World XI surprised fans: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना सध्या इंग्लंडमध्ये आहे आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजंड्स २०२५ ( WCL) स्पर्धेत तो इंडियन चॅम्पियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाविरुद्ध २२ जुलैला झालेल्या सामन्यात त्याने ११ चेंडूंत १६ धावांची खेळी केली होती. या सामन्यानंतर रैनाला जेव्हा त्याची जगातील सर्वोत्तम ११ खेळाडूंची टीम विचारली, तेव्हा त्याने केलेली निवड ही आश्चर्यचकित करणारी ठरली.