Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव तंदुरुस्ती चाचणीत उत्तीर्ण; आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत नेतृत्व करण्यावर शिक्कामोर्तब
Asia Cup 2025: आगामी आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करणार आहे. जर्मनीतील शस्त्रक्रियेनंतर तो फिटनेस चाचणीत यशस्वी ठरला असून बीसीसीआयने त्याला हिरवा कंदील दिला आहे.
नवी दिल्ली : आगामी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार, हे निश्चित झाले आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सूर्यकुमार यादव त्याची तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाला आहे.