मोठी बातमी :सूर्यकुमार यादवची संघात अचानक एन्ट्री, श्रेयस अय्यरच्या जागी मिळाली संधी

Mumbai Ranji Trophy squad quarterfinal: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकली आणि टीम इंडिया वन डे मालिकेसाठी नागपूरात दाखल झाली आहे.
Suryakumar Yadav replaces Shreyas Iyer
Suryakumar Yadav replaces Shreyas Iyer esakal
Updated on

Suryakumar Yadav IN, Shreyas Iyer Out: भारतीय संघाने आणखी एक ट्वेंटी-२० मालिका खिशात घातली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने ४-१ अशा फरकाने इंग्लंडवर विजय मिळवला. त्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ कालच नागपूरात दाखल झाला आहे आणि ६ फेब्रुवारीला पहिला सामना होणार आहे. त्याआधी भारतीय संघात बदल पाहायला मिळणार आहेत, ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या संघातील मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आदी काही खेळाडू सोडल्यास इतरांना वन डे संघात संधी मिळणार नाही. त्यामुळेच उर्वरित खेळाडू आपापल्या राज्याच्या संघाकडून खेळण्यासाठी परतले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com