Suryakumar Yadav
esakal
India T20 captaincy future after SKY struggles: कर्णधारपदाची माळ गळ्यात पडल्यापासून सूर्यकुमार यादवचा फॉर्म त्याच्यावर रुसलेला दिसतोय... ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही अमेरिकेविरुद्धचा सामना सोडल्यास सूर्याला काही खास कामगिरी करता आलेली नाही. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०२५-२६ च्या हंगामात त्याला २३ सामन्यांत ३३.४४ च्या सरासरीने ६०२ धावा करता आल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्येही त्याने खास काही कामगिरी केलेली नाही. त्यामुळे त्याचे टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपद धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे. भारतीय संघ आयपीएलनंतर आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यावर एकूण सात ट्वेंटी-२० सामने खेळायला जाणार आहेत. त्यात सूर्या कर्णधार म्हणून दिसेल का? हा प्रश्न सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.