
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याने पहिल्यांदाच नागपूरमध्ये जंगल सफारीचा अनुभव घेतला आणि पहिल्याच भेटीत चार वाघांचे दर्शन घेतल्याने तो हरखून गेला. ‘हे तर माझे नशीबच!’ अशा शब्दांत त्याने आपल्या आनंदाची भावना व्यक्त केली.
नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट सामन्यानंतर सूर्यकुमार यादव नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट द्यायला गेला होता. त्याची ही सफर गोपनीय ठेवण्यात आली होती. शुक्रवारी (ता.८) दुपारच्या सत्रात खुर्सापार येथे त्याने जंगल सफारीचा अनुभव घेतला.