Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

Suryakumar Yadav comeback in Team India: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ जिंकून देणारा कर्णधार असूनही सूर्यकुमार यादवला भारतीय संघाच्या नेतृत्वपदावरून हटवण्यात आले आणि संघातूनही वगळण्यात आले. त्यानंतर श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली.
Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

esakal

Updated on

Suryakumar Yadav return after captaincy removal: भारतीय संघाला २०२६चा वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदावरून आणि टीममधून अचानक काढले गेले. जेतेपदाची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूर्यकुमारने २०२८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न बोलून दाखवले होते, परंतु अजित आगरकरच्या निवड समितीने त्याच्याकडून नेतृत्व काढून घेतले आणि त्याला संघाबाहेच केले. आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या डोक्यात काही वेगळाच प्लान सुरू होता. त्यांनी २०२३ पासून भारताकडून एकही ट्वेंटी-२० सामना न खेळलेल्या श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. पण, अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सलग सहा पराभवांचा सामना करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com