Suryakumar Yadav : टी-२० फलंदाजीत सूर्यकुमार यादवचे अव्वल स्थान कायम

दुखापतीमुळे गेले तीन महिने क्रिकेटपासून दूर असला तरी सूर्यकुमार यादवने टी-२० प्रकारातील फलंदाजी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar Yadavsakal

दुबई : दुखापतीमुळे गेले तीन महिने क्रिकेटपासून दूर असला तरी सूर्यकुमार यादवने टी-२० प्रकारातील फलंदाजी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. प्रदीर्घ काळानंतर पुन्हा मैदानात उतरणाऱ्या अफगाणिस्तानच्या रशिद खानने गोलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल १० गोलंदाजांत स्थान मिळवले.

Suryakumar Yadav
IPL 2024: तीन संघांत नेतृत्वबदल, पाहा सर्व 10 कर्णधारांची यादी

सूर्यकुमार यादव आयपीएलमधून पुनरागमन करेल; परंतु नेमका तो कधी मैदानात उतरेल हे अनिश्चित आहे; परंतु आंतरराष्ट्रीय मानांकन क्रमवारीत तो ८६१ गुणांसह आघाडीवर आहे. दुसऱ्या स्थानावर असलेला फिल साल्टच्या नावावर ८०२ गुण आहेत.

रशिद खानही बराच काळ दुखापतीमुळे बाहेर होता; परंतु अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत मिळवलेल्या २-१ अशा विजयात रशिद खानने चमकदार कामगिरी केली. मालिकेत त्याने आठ विकेट मिळवल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com