
Syed Mushtaq Ali Trophy 2024: बडोदा संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या लढतीत गुरुवारी सिक्कीमविरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला. आयपीएल वगळता भारताच्या देशांतर्गत ट्वेंटी-२० स्पर्धेत पॉवर प्ले मध्ये १०० धावा करण्याचा मान, ट्वेंटी-२० क्रिकेटमधील वेगवान २०० धावांचा विक्रम असे अनेक पराक्रम कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बडोदा संघाने केले.