India vs Pakistan fight viral video fact check
esakal
Was there a fight in India Pakistan T20 World Cup match? भारतीय महिला संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली... दीप्ती शर्माच्या पाच विकेट्स अन् स्मृती मानधनाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने शेजाऱ्यांवर दणदणीत विजय मिळवला. पण, या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात भारत-पाकिस्तान खेळाडूंमध्ये हाणामारी झाल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानी गोलंदाज मुद्दाम भारतीय फलंदाजला डिवचताना दिसतेय आणि संतापलेल्या भारतीय खेळाडूने तिचा गळा पकडला. त्यानंतर अम्पायर व अन्य खेळाडूंनी हा वाद मिटवला.. पण, या व्हिडीओमागचं सत्य काही वेगळं आहे.