T20 World Cup 2024 : पाकिस्तान USA कडूनही हरणार.... पीसीबीच्या माजी प्रमुखाने संघाची लायकी दाखवून दिली

Ramiz Raja
T20 World Cup 2024 Ramiz Raja Pakistan Cricket Teamesakal

T20 World Cup 2024 Ramiz Raja Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघाची अपुरी तयारी टी 20 वर्ल्डकपआधीच समोर आली. त्यांना आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात पराभव सहन करावा लागला. त्यानंतर पाकिस्तान संघावर जोरदार टीका होत आहे. आता पीसीबीचे माजी प्रमुख रमीझ राजा यांनी संघाच्या तयारीवर आणि कॉम्बिनेशनवर टीका केली.

पाकिस्तानचा आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव झाला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये सातव्या स्थानावर घसरला आहे. टी 20 वर्ल्डकप तोंडावर आला असताना संघाची ही कामगिरी पाहून चाहत्यांना नक्कीच टेन्शन आले असेल.

Ramiz Raja
MS Dhoni CSK vs RR : चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर... राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?

दरम्यान, रमीझ राजा यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरून संघावर टीका केली. ते म्हणाले की, 'तुम्ही आयर्लंडविरूद्धच्या पराभवाचे समर्थन करू शतक नाही. संघाची देहबोली दुबळी होती. तुम्ही असे टीम कॉम्बिनेशन तयार केले ज्याचा परिणाम संघावर झाला आहे. संघ चांगली कामगिरी करत होता.'

'मात्र कर्णधार बदलण्यात आला. आता नवीन कर्णधाराला बदलून जुनाच कर्णधार परत आणण्यात आला आहे. वर्ल्डकपच्या वर्षात संघचं रँकिंग सातव्या स्थानावर घसरलं आहे. हे रँकिंग तुमच्या संघाची खरी स्थिती दर्शवत.'

रमीझ राजा यांनी पाकिस्तान संघ टी20 वर्ल्डकपमध्ये युएसएकडून हरला तर आश्चर्य वाटायला नको असं देखील वक्तव्य केलं. ते म्हणाला की, 'पाकिस्तान कसा वर्ल्डकप जिंकणार, तुमच्याकडे कॉम्बिनेशन नाही, सलामी जोडी सेट नाही, सेट फलंदाज विकेट्स गमावत आहेत. मधली फळी योग्यरित्या कार्य करत नाहीये. अशा परिस्थिती पाकिस्तान कशी सेमी फायनल गाठेल?

ते पुढे म्हणाले की, 'मला वाटतं युएसएचा संघ देखील पाकिस्तानला जड जाणार आहे. कारण त्यांच्या संघात देखील भारत आणि पाकिस्तानचे काही खेळाडू खेळत आहेत.'

Ramiz Raja
Sunil Gavaskar IPL 2024 : आयपीएल सोडून देशाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना शिक्षा करा! गावसकरांनी BCCI कडे केली मागणी

पाकिस्तानचे टी 20 वर्ल्डकप शेड्युल

  • पाकिस्तान विरूद्ध युएसए - 6 जून (डल्लास)

  • भारत विरूद्ध पाकिस्तान - 9 जून (न्यू यॉर्क)

  • पाकिस्तान विरूद्ध कॅनडा - 11 जून (न्यू यॉर्क)

  • पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड - 16 जून (लौडेरहिल)

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com