
Jasprit Bumrah Ruled Out Champions Trophy 2025: भारतीयांना नको हवी होती, तिच बातमी BCCI ने मंगळवारी रात्री ११.३७ दिली... जसप्रीत बुमराह याला पाठीच्या दुखापतीमुळे दुर्दैवाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार आहे. निवड समितीने बुमराहच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान दिले आहे आणि त्याचवेळी वरुण चक्रवर्थीचीही निवड केली. त्याच्यासाठी यशस्वी जैस्वालला राखीव खेळाडूंमध्ये बसवण्याचा निर्णय घेतला गेला. आता भारतीय संघ ५ फिरकीपटू, ३ जलदगती गोलंदाज अन् ७ फलंदाजांसह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दुबईला १५ फेब्रुवारीला रवाना होईल. पण, कर्णधार रोहित शर्म ( Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यांनी खूप मोठा घोळ घालून ठेवला आहे. तो कदाचित भारताला महागात पडू शकतो...