India Test squad for England 2025 under Shubman Gill
भारतीय संघ नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया नवीन कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली पहिलीच कसोटी मालिका खेळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ च्या हंगामातील टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे आणि त्यामुळे युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ कसा खेळतो, याची उत्सुकता आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय खेळाडू काल रात्री इंग्लंडच्या दिशेने रवाना झाले.