Rohit Sharma ODI future latest update
esakal
India West Indies ODI squad 2026: भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे मालिकेत खेळणार आहे. या मालिकेसाठी उद्या अजित आगरकरच्या ( Ajit Agarkar) अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक पार पडणार आहे. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या IND vs WI मालिकेसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात रोहित शर्मा ( Rohit Sharma) व हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) या दोन नावांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहितचं वय अन् हार्दिकची फिटनेस, या गोष्टींवर त्यांचे खेळणे, न खेळणे अवलंबून आहे. आगरकरच्या नेतृत्वाखाली होणारी ही शेवटची बैठक असेल आणि यातच रोहितच्या भविष्याचा फैसला होईल, अशी चर्चा जोर पकडतेय.