लंडन: भारतीय पुरुष संघाला काही दिवसांपूर्वी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली होती; पण याच मैदानावर भारतीय महिला संघाला मालिका विजयाची मोहीम फत्ते करण्याची संधी आहे..भारत आणि इंग्लंड यांच्यातील महिला एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना उद्या शनिवारी (ता. १९) लॉर्ड्सवर होत आहे. भारतीयांनी पहिला सामना जिंकलेला आहे, त्यामुळे उद्याचा सामना जिंकला तर तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी मिळवता येईल..इंग्लंडविरुद्धची ही भारतात होणाऱ्या आगामी महिला एकदिवसीय विश्वचषकाची तयारी म्हणूनही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विविध खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे अंतिम विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा तीव्र झाली आहे; मात्र प्रशिक्षक अमोल मुजुमदार आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यासाठी अनेक पर्याय तपासण्यासाठी सुवर्णसंधी आहे. रेणुका ठाकूर आणि पूजा वस्त्राकर या प्रमुख वेगवान गोलंदाज अनुपस्थित असतानाही नवोदित क्रांती गौड हिने पहिल्या सामन्यात दोन विकेट मिळवून आपल्या क्षमतेचा ठसा उमटवला. तिच्यासोबत अमनजोत कौर हिने नव्या चेंडूवर प्रभावी मारा केला..स्मृती मानधनासोबत सलामीसाठी प्रतीका रावल हिला प्राधान्य दिले गेले आहे. शफाली वर्माने एकदिवसीय संघात पुनरागमन केल्यास रावलला तिसरा क्रमांक दिला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत हरलीन देओलसारख्या फॉर्मात असलेल्या खेळाडूला अंतिम अकरामध्ये स्थान देणे कठीण ठरू शकते, कारण हरमनप्रीत, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांचे स्थान निश्चित आहे..दीप्ती शर्मा, स्नेह राणा आणि राधा यादव यांच्यासोबत आता डावखुरी फिरकीपटू श्री चरणी हिचाही समावेश झाला आहे. श्री चरनीने आधीच्या ट्वेन्टी-२० मालिकेत १० विकेट घेत मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता..Chh. Sambhajinagar Crime: सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार; छत्रपती संभाजीनगर मधील घटना .दीप्ती शर्माचे निर्णायक योगदानपहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या विजयात फलंदाज म्हणून निर्णायक कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माने रिषभ पंतच्या शैलीतील एका हाताने मारलेला षटकार लक्षवेधी ठरला आहे.उद्याच्या सामन्यातही तिच्याकडून अशाच निर्णायक योगदानाची अपेक्षा आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.