13 Indian cricketers injured and undergoing rehabilitation at NCA
esakal
13 Indian cricketers injured and undergoing rehabilitation at NCA: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI) बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) हे भारतीय संघाचे 'दुखापतींचे केंद्र' बनले आहे, असंच म्हणण्याची वेळ आली आहे. ज्या CoE मधून भारतीय क्रिकेटच्या भविष्याचे खेळाडू घडत होते, त्याच केंद्रात आता वर्तमान व भविष्यात क्रिकेटचे मैदान गाजवणाऱे खेळाडू उपचार घेत आहेत. यामध्ये प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह पासून ते हार्दिक पांड्यापर्यंत अशा १३ खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर CoE मध्ये मेहनत घेत आहेत.