
Team India left for Dubai Champions Trophy 2025: बुधवारपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यासाठी भारतीय संघ दुबईला रवाना झाला आहे. भारतीय संघ २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरूद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. इंग्लंडला घरच्या मैदानावर व्हॉईटवॉश करून दुबईसाठी निघालेला भारतीय संघ एकही सराव सामना न खेळता थेट मैदानात उतरणार आहे. अनुवभी व नवख्या खेळाडूंचे मिश्रण असलेला भारतीय संघ उद्यापासून दुबईच्या मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारीला सुरू करेल.