
India’s Squad for Champions Trophy 2025 Finalized: दोन महिन्यांच्या कसोटी मालिकेसाठीच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ आता मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका आणि त्यानंतर ३ सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. २२ जानेवारीपासून कोलकाता येथून ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतरच्या वन डे मालिकेतील सामने ६, ९ व १२ फेब्रुवारीला अनुक्रमे नागपूर, कटक व अहमदाबाद येथे खेळवले जातील. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या तयारीसाठी ही वन डे मालिका महत्त्वाची आहे.