

Rohit Sharma
esakal
India vs West Indies ODI squad announced 2026: रोहित शर्माचा समावेश असलेला १५ सदस्यीय संघ बीसीसीआयने आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी जाहीर केला. निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) त्याच्या कार्यकाळातील शेवटच्या बैठकीत काही कठोर निर्णय घेईल, अशी चर्चा रंगली होती. त्यात रोहितच्या समावेशाचा प्रमुख मुद्दा होता. पण, अखेर रोहितच्या संघातील स्थानाला हात लावण्याचा धोका आगरकरने उचलला नाही.