
WTC Points and Percentage System : भारतीय क्रिकेट संघाला गेल्या दोन कसोटी मालिकेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा (WTC 2023-25) अंतिम सामना खेळण्याचे स्वप्नही भंगले. पण आता झालेल्या गोष्टी विसरून भारताला पुढे जावे लागणार आहे.
WTC 2023-25 स्पर्धा सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आता जून २०२५ पासून WTC स्पर्धेचे पुढचे पर्व खेळवले जाणार आहे. त्यामुळे आता त्यादृष्टीने भारताला पुढच्या योजना आखाव्या लागणार आहेत.
भारतासाठी पुढचा मार्ग कसा असणार आहे आणि भारतासमोर कोणकोणच्या संघांचं आव्हान असणार आहे. याशिवाय WTC स्पर्धेचे नक्की नियम काय असतात हेच जाणून घेऊ.