Prince Yadav injury update vs Zimbabwe
esakal
IND vs ZIM 3rd T20I predicted playing XI: भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२०त ९० धावांनी दणदणीत विजय मिळवून झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. इशान किशन ( ८१) व तिलक वर्मा ( ६०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ५ बाद २१९ धावा उभ्या केल्या, प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ १७.५ षटकांत १२९ धावांत तंबूत परतला. अभिषेक शर्माने ३, तर यश ठाकूर व प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. पण, या सामन्यात प्रमुख खेळाडूला दुखापत झाली आणि तो तिसऱ्या सामन्याला मुकणार असल्याचे संकेत कर्णधार श्रेयस अय्यरने दिले आहेत.