T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Team India Probable Playing XI For ICC T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Team India Probable Playing XI For ICC T20 World Cup 2024 News Marathi
Team India Probable Playing XI For ICC T20 World Cup 2024 News Marathisakal

Team India Probable Playing XI For ICC T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक दिग्गज खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे, तर असे अनेक खेळाडू होते ज्यांना 15 सदस्यीय संघात स्थान मिळू शकले नाही. संघात निवड झालेल्या खेळाडूंच्या आधारे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते.

Team India Probable Playing XI For ICC T20 World Cup 2024 News Marathi
Hardik Pandya : कर्णधार पांड्यावर लागणार बंदी; BCCI ने हार्दिकसह संपूर्ण मुंबई संघांवर घेतली मोठी ॲक्शन

सलामीवीर

कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल हे टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलामीवीर म्हणून दिसणार आहेत. याआधी विराट कोहलीबद्दल असेही बोलले जात होते की तो ओपनिंग करेल मात्र यशस्वी जैस्वालच्या निवडीनंतर तो ओपनिंग करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिडिल ऑर्डर

विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव मधल्या फळीत खेळताना दिसणार आहेत. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळेल. या दोघांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे.

Team India Probable Playing XI For ICC T20 World Cup 2024 News Marathi
Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

विकेटकीपर

ऋषभ पंतची यष्टिरक्षक म्हणून निवड होऊ शकते. संजू सॅमसनही संघात आहे पण डावखुरा असल्याने ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिली संधी मिळू शकते.

अष्टपैलू खेळाडू

हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांना अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळू शकते. हे दोन्ही खेळाडू तिन्ही विभागात योगदान देण्यास सक्षम आहेत. अशा स्थितीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्कीच स्थान मिळेल.

फिरकीपटू

यूएसए आणि वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकतात आणि त्यामुळेच कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे दोघेही एकत्र खेळू शकतात. जर रवींद्र जडेजाही असेल तर एकूणच टीम इंडिया तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकते.

Team India Probable Playing XI For ICC T20 World Cup 2024 News Marathi
CSK vs PBKS IPL 2024 : प्ले-ऑफसाठी रस्सीखेच! चेन्नईशी आज भिडणार पंजाब; कोण मारणार बाजी?

वेगवान गोलंदाज

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे पहिली पसंती असू शकतात. अर्शदीप सिंगची देखील निवड करण्यात आली आहे परंतु शक्यतो फक्त बुमराह आणि सिराज यांना सुरुवातीच्या सामन्यात खेळवले जाईल.

टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com