Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

Team India full schedule till IPL 2027: टीम इंडियाचा इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पर्यंतचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रम चांगलाच व्यस्त असणार आहे. बीसीसीआयच्या नियोजनानुसार भारतीय संघ या कालावधीत तब्बल ७ कसोटी, १४ वन डे आणि १६ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे.
Rohit Sharma - Virat Kohli

Rohit Sharma - Virat Kohli

Sakal

Updated on

India cricket schedule 2026-27 14 ODIs 16 T20Is 7 Tests: भारतीय संघ चार दिवसानंतर अफगाणिस्तानविरुद्ध तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर IND vs AFG मालिका खेळवली जाणार आहे. पण, सर्वांना उत्सुकता आहे ती, रोहित शर्मा व विराट कोहली ,या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याची. इंग्लंड दौऱ्यानंतर भारताची वन डे मालिका झालेली नाही आणि रोहित व विराट हे फक्त वन डे क्रिकेट खेळत आहेत. २०२७ च्या वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने आता भारताकडे १४ वन डे सामनेच राहिले आहेत आणि या प्रत्येक सामन्यावर चाहत्यांची नजर असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com