Full schedule of Indian cricket team after T20 World Cup
esakal
Cricket
Team India Schedule: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे वेळापत्रक; अफगाणिस्ताननंतर कोणकोणत्या संघाला भिडणार, घ्या जाणून
Team India upcoming tours and fixtures 2026 : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मोहिमेनंतर पुन्हा व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाला सामोरे जाणार आहे. स्पर्धेनंतर इंडियन प्रीमिअर लीग आणि त्यानंतर लगेचच द्विपक्षीय मालिकांची मालिका सुरू होणार असून, घरच्या मैदानावर आणि परदेशात असे दोन्ही दौरे नियोजित आहेत.
Full schedule of Indian cricket team after T20 World Cup : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ५ मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध हा सामना होणार आहे आणि त्यानंतर ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल सामना होईल. यानंतर भारतीय खेळाडू काही दिवसांच्या विश्रांतीवर जातील आणि त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आपापल्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसतील. पण, भारतीय खेळाडू पुन्हा एकदा निळ्या जर्सीत एकत्रित कधी खेळताना दिसणार आहे? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
