
who will be in the playing XI for India in Champions Trophy 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची आज घोषणा करण्यात आली. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी मुंबईतील BCCIच्या मुख्यालयात इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली. रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) कर्णधारपद,तर शुभमन गिलकडे उप कर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याचे संघात पुनरागमन झाले असताना मोहम्मद सिराजला डच्चू मिळालेला आहे.