
team india squad for icc champions trophy 2025: आज, उद्या करता करता अखेर टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी घोषणा झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भारताचा संघ जाहीर केला. CT25 पूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि आज जाहीर करण्यात आलेलाच संघ या मालिकेतून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली BCCI ने तगडा संघ जाहीर केला आहे. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) या संघात आहे खरा, परंतु त्याच्या तंदुरुस्तीच्या अहवालावरच त्याच्या खेळण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.