THE HUNDRED: १५९ धावांचं आव्हान, २ चेंडू शिल्लक अन् ट्रॉफीवर नाव! संजीव गोएंका यांच्या सुपर जायंट्सचा थरारक विजय, जेतेपदाला गवसणी

The Hundred 2026 Final : मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा पराभव करत द हंड्रेड मेन्स २०२६चे विजेतेपद पटकावले. १५९ धावांचे लक्ष्य मँचेस्टरने २ चेंडू आणि ५ विकेट शिल्लक ठेवून गाठले. टीम सेफर्टच्या ७२ धावांच्या खेळीने विजयाचा पाया रचला.
THE HUNDRED

THE HUNDRED

esakal

Updated on

THE HUNDRED 2026 FINAL: मँचेस्टर सुपर जायंट्सने प्रथमच द हंड्रेड मेन्स स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. रविवारी लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात मँचेस्टर सुपर जायंट्स आणि ट्रेंट रॉकेट्स आमनेसामने होते. या सामन्यात मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सने दिलेले १५८ धावांचे लक्ष्य १९.३ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले.

या सामन्यात टीम सेफर्टने ३८ चेंडूंत ७२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत विजयाचा पाया रचला. त्याच्या या खेळीमुळे संघाला विजेतेपद मिळवण्यात मोठी मदत झाली, तर लियाम डॉसनने शेवटच्या क्षणी षटकार मारत संघाला विजेतेपद मिळवून दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com