
गेल्या काही वर्षात आयपीएल संघांच्या सिस्टर फ्रँचायझीही जगभरातील बऱ्याच लीग स्पर्धांमध्ये पाहायला मिळत आहे. कोलकातामधील बिझनेसमन संजीव गोयंका यांच्याही मालकीचे आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि साऊथ आफ्रिकी टी२० लीगमध्ये डर्बन सुपर जायंट्स असे दोन संघ आहेत. आता त्यांनी आणखी एका संघात गुंतवणूक केली आहे.
इंग्लंडमध्ये द हंड्रेड ही १०० चेंडूच्या सामन्यांची स्पर्धा खेळवली दाते. त्यातील लँकाशायरस्थित मँचेस्टर ओरिजिनल्स फ्रँचायझीमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. या संघाचा कर्णधार जॉस बटलर आहे, पण गेल्या हंगामात त्याच्या अनुपस्थितीत या संघाचे नेतृत्व फिल सॉल्टने केले होते.