आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठीच्या अटींमध्ये अलिकडेच अनेक बदलांना मान्यता दिली आहे. यापैकी काही नवीन नियम जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२५-२७ नवीन हंगामात आधीच लागू झाले आहेत. पण, आता दोन जुलैपासून कसोटी क्रिकेटमध्ये काही नवीन नियम लागू होणार आहेत. भारत-इंग्लंड यांच्यातली दुसरी कसोटी २ जुलैपासूनच सुरू होणार आहे.