Harshit Rana addresses the media after the match
esakal
Harshit Rana reveals team management all-rounder plan : भारतीय गोलंदाज हर्षित राणा याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघात त्याला सातत्याने संधी मिळतेय आणि यावरूनची तो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir) 'लाडक्या'लिस्टमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. सातत्य राखणाऱ्या इतर वेगवान गोलंदाजांपेक्षा राणाकडे वेगवान गोलंदाजी आणि सातत्याने अचूक मारा करण्याची क्षमता कमी आहे. त्याच्याकडे १४५ किमी प्रति तासापेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. पण, त्यात अचूकता नाही, तरीही दिल्लीचा हा खेळाडू एक परिपूर्ण खेळाडू आहे.