
श्रीलंका लायन्स संघाचा खेळाडू थिसारा परेरा ( Thisara Parera) याने आशियाई लिजंड्स लीग २०२५ मध्ये शनिवारी वादळी खेळी केली. त्याने अफगाणिस्तान पठाण विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात शेवटच्या षटकात सहा षटकार खेचले. त्याने दमदार फटकेबाजी करून ३६ चेंडूंत १०८ धावांची खेळी केली आणि श्रीलंका लायन्स संघाला २६ धावांना विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.