Gautam Gambhir trusted player for World Cup 2027
esakal
Gautam Gambhir trusted Tilak Varma impresses in Duleep Trophy: भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा २०११ पासूनचा दुष्काळ संपवायचा आहे. २०१९ मध्ये उपांत्य फेरी आणि २०२३ मध्ये अंतिम फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला. तीन वर्षापूर्वीचा निकाल हा खूपच जिव्हारी लागणारा ठरला, कारण आपण आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर हरलो. पण, २०२७ साठी भारतीय संघ सर्व जोर लावणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या खेळण्यावर अजूनही चर्चा सुरू असली तरी संघ व्यवस्थापनाने सर्व आघाड्यांवर पर्यायी खेळाडूंची फळी तयार करण्याचे ठरवले आहे. त्याच पर्यायापैकी एकाने आज दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत उल्लेखनीय कामगिरी करून संघाला संकटातून बाहेर काढले.