
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. सोमवारी इंस्टाग्राम पोस्टवरून त्याने आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. विराटने १२३ कसोटी क्रिकेटमध्ये ३० शतकं व ३१ अर्धशतकांसह ९२३० धावा केल्या आहेत. विराट कोहली कसोटी फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे, हे कुणीही नाकारणार नाही. त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ६८ पैकी ४० सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये वेगाना ७००० धावा करणारा तो भारतीय फलंदाज आहे. शिवाय कर्णधार म्हणून सात द्विशतकं नावावर असलेला जगातील एकमेव फलंदाज तोच आहे. कर्णधार म्हणून त्याने ६८ सामन्यांत ५४.८०च्या सरासरीने ५८६४ धावा केल्या आहेत आणि त्यात २० शतकं व १८ अर्धशतकांचा समावेश आहे.