Ira Jadhav signs ₹10 lakh deal with Aakash Tigers in T20 Mumbai Women’s League auction
esakal
16-Year-Old Ira Jadhav Creates Buzz as Most Expensive Pick in Mumbai League : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आयोजित केलेल्या पहिल्या 'T20 मुंबई विमेन्स लीग'च्या लिलावात १६ वर्षांची फलंदाज आयरा जाधव (Ira Jadhav) सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. आयरासाठी आकाश टायगर्स संघाने १० लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली. या लिलावासोबतच मुंबईतील महिला क्रिकेटच्या एका नवीन पर्वाची अधिकृत सुरुवात झाली आहे. लिलावात ३६३ खेळाडूंवर बोली लावण्यात आली, ज्यापैकी ५० खेळाडूंची निवड करण्यात आली. सर्व फ्रँचायझींनी मिळून एकूण १.४७ कोटी रुपये खर्च केले.