
SA vs SL Test Match: दक्षिण आफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज ट्रिस्टन स्टब्स आणि टेम्बा बवूमाने शुक्रवारी श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात विक्रमी भागीदारी केली. या भागीदारी दरम्यान दोघांनी शतके ठोकली. श्रीलंकेविरूद्ध दुसऱ्या डावात किंग्जमेडमधील डर्बन मैदानावर त्यांनी २४९ धावांची भागीदारी केली. यावुर्वी २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी दिग्गज माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिस आणि एबी डिव्हिलियर्स न्यूलॅंड केप टाऊन मैदानावर १९२ धावांची सर्वोत्तम भागीदारी केली होती. स्टब्स आणि बवूमा यांनी हा १२ १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.