Fastest T20 international century for Turkey : ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये नवीन संघ आपली छाप पाडताना दिसत आहेत. काल ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या युरोपियन पात्रता स्पर्धेत जर्सी देाने स्कॉटलंडला स्पर्धेबाहेर केले. त्यानंतर इटलीने नेदरलँड्स संघासोबत पुढल्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपची पात्रता निश्चित केली. शनिवारी टर्कीच्या मुहम्मद फहाद खान याने विक्रमी फटकेबाजी केली आणि संघाला ५९ धावांनी विजय पक्का केला.