Ranji Trophy : तुषार देशपांडेने तीन चेंडूंत मॅच फिरवली, ७ फलंदाज ३७ धावांत तंबूत; मुंबईसाठी असा पराक्रम करणारा सहावा गोलंदाज

Tushar Deshpande hat-trick in Ranji Trophy 2026-27: रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी चंडीगडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. मुंबई आणि चंदीगड यांच्यातील सामन्यात तुषारने हॅटट्रिक घेत शानदार कामगिरी केली.
Tushar Deshpande hat-trick in Ranji Trophy 2026-27

Tushar Deshpande hat-trick in Ranji Trophy 2026-27

esakal

Updated on: 

Mumbai vs Chandigarh Ranji Trophy match highlights: फलंदाजीत ४४ धावांचे महत्त्वाचे योगदान देणाऱ्या तुषार देशपांडेने ( Tushar Deshpande ) गोलंदाजीत कमाल दाखवली. मुंबईच्या पहिल्या डावातील ४२९ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या चंदीगडचा निम्मा संघ त्याने २५ धावांत तंबूत पाठवला. तुषारने डावातील ११ व्या षटकात हॅटट्रिक घेऊन तीन चेंडूंत सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूने झुकवला. रणजी करंडक स्पर्धा इतिहासातील ही ८६ वी हॅटट्रिक ठरली, तर मुंबईकडून असा पराक्रम करणारा तो सहावा गोलंदाज ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com