
U19 Asia Cup India vs Pakistan: १९ वर्षीय आशिया कप २०२४ स्पर्धेत शनिवारी (३० नोव्हेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना होत आहे. या सामन्यात पाकिस्तानकडून शाहझैब खानने दमदार दीडशतकी खेळी केलेली. पण नंतर आयुष म्हात्रेने भारताला पुनरागमन करून दिले.
दरम्यान, आयुष म्हात्रेने घेतलेल्या दुसऱ्या विकेटचे श्रेय त्याच्यासोबतच मोहम्मद अमीन आणि युधजीत गुहा यांनाही जाते. या दोघांनीही दाखवलेल्या सांघिक कामगिरीमुळे पाकिस्तानला दुसरा धक्का बसला होता.