U19 Women Asia Cup 2024: १९ वर्षांखालील महिलांच्या ट्वेन्टी-२० आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेची भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली आहे. शुक्रवारी आयुषी शुक्लाच्या प्रभावी माऱ्यानंतर भारताने श्रीलंकेचा चार विकेट राखून पराभव केला..Womens U19 Asia Cup 2024 : भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय; जी त्रिशाच्या अर्धशतकासह १२.१ षटकांतच केले लक्ष्य पूर्ण.भारताचा अंतिम सामना बांगलादेश महिला संघाशी रविवारी होणार आहे. बांगलादेश संघाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेपाळच्या महिला संघाचा नऊ विकेटने पराभव केला..प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला तीन अंकी धावसंख्याही भारतीयांनी गाठू दिली नाही. २० षटकांत त्यांना ९ बाद ९८ असे रोखले. यात आयुषी शुक्लाने १० धावांत ४ विकेट मिळवल्या. श्रीलंकेकडून केवळ दोनच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आल्या. त्यांच्या ९८ धावांत भारतीयांनी दिलेल्या ११ अवांतर धावांचा समावेश आहे..हे माफक आव्हान भारतीय संघाने १४.५ षटकांतच पार केले. भारताची २ बाद ५ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर कमलिनी हिने २८ आणि गोंगदी त्रिशा हिने ३२ धावांची आक्रमक खेळी करून भारताचा विजय अधिकच सोपा केला. या दोघींनी ५.४ षटकांतच ६३ धावांची भागीदारी केली..WPL Auction: पाकिस्तानविरुद्ध आधी U19 टीम इंडियाला विजय मिळवून दिला अन् कामिलिनीसाठी दोन तासात मुंबई इंडियन्सन दीड कोटी मोजले.संक्षिप्त धावफलक :श्रीलंका १९ वर्षांखालील संघ : २० षटकांत ९ बाद ९८ (समुदू निसांसला २१, मनुदी नानयाकारा ३३ -३० चेंडू, १ चौकार, २ षटकार, अवांतर ११, शबनम शकिल ३-०-८-१, द्रिती केसरी ३-०-२७-१, परुनिका सिसोदिया ४-०-२७-२, आयुषी शुक्ला ४-०-१०-४) पराभूत वि. भारत १९ वर्षांखालील संघ : १४.५ षटकांत ६ बाद १०२ (जी. कमलिनी २८ - २६ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, गोंगदी त्रिशा ३२ - २४ चेंडू, २ चौकार, ३ षटकार, मिथिला विनोद नाबाद १७ - १२ चेंडू, ४ चौकार, अवांतर १०, चामोदी प्रबोदा ४-०-१६-३, शशिनी गिमहानी ४-१-१८-२).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.