Henil Patel bowling performance vs USA U19 in ICC U19 Men's Cricket World Cup 2026
esakal
ICC U19 Men's Cricket World Cup 2026 Live Marathi Update: सहावेळचा वर्ल्ड कप विजेता भारतीय संघ १९ वर्षांखालील स्पर्धेत आणखी एक जेतेपद नावावर करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अमेरिकेविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशीचा जो फॉर्म सुरू आहे, तो पाहता भारताने प्रथम फलंदाजी घेणे अपेक्षित होते. त्यामुळे चाहेते किंचीत निराश झाले आहेत. पण, गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. हेनिल पटेलने दुसऱ्याच षटकार अमरिंदर गिलला ( १) बाद केले.