Hilarious scenes in Lahore as a Pakistani TV umpire’s DRS confusion on Babar Azam’s wicket
esakal
Babar Azam wicket DRS controversy video: पाकिस्तानने सईम अयुबच्या अष्टपैलू कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात २२ धावांनी विजय मिळवला. यजमान पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात बाबर आझमने २४ धावांची खेळी खेळली. त्याला अॅडम झम्पाने पायचीत करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले, परंतु बाबरच्या बाद होताना अशी घटना घडली जी पाहून चाहते हसू आवरू शकत नाहीत. LBW निर्णयादरम्यान तिसऱ्या पंचांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, त्याने पाकिस्तानची जगासमोर लाज गेली.