दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १७२ धावा केल्या.
डेवॉल्ड ब्रेव्हिसने २६ चेंडूंत ५३ धावांची तडाखेबंद खेळी केली.
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड, अॅडम झम्पा यांनी २ आणि नॅथन एलिसने ३ विकेट्स घेतल्या.
Australia vs South Africa 3rd T20I highlights 2025: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला तिसरा व मालिकेतील शेवटचा ट्वेंटी-२० सामना रोमांचक झाला... मालिकेत फार कमाल न करू शकलेल्या ग्लेन मॅक्सवेलने ( Glenn Maxwell ) एक चेंडू व २ विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाला थरारक विजय मिळवून दिला. विजयासाठी शेवटच्या षटकांत १० धावांची गरज असताना पहिल्या दोन चेंडूंत ( २ व ४) मॅक्सवेलने ६ धावा जोडल्या. पण, त्यानंतर पुढील दोन चेंडू निर्धाव गेल्याने २ चेंडूंत ४ धावा असा सामना अटीतटीचा आला. मॅक्सवेलने फटके चांगले खेचले होते, परंतु एक धाव घेण्यास त्याने नकार दिला. पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने विचित्र फटका मारून सामन्याचे चित्र बदलले आणि कांगारूंनी बाजी मारली.