Snake charmer spotted at Galle stadium during SL vs BAN 1st Test
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातली पहिली कसोटी मॅच रंजक वळणावर आली आहे. बांगलादेशच्या २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान श्रीलंकेने ५० धावांत ४ फलंदाज गमावले आहेत. १२ षटकांचाच खेळ शिल्लक असल्याने यजमान हा सामना अनिर्णिय राखण्या यशस्वी होतील, हे दिसत आहे. पण, बांगलादेशच्या गोलंदाजांचा काही नेम नाही. श्रीलंकेला आणखी २४६ धावांची गरज आहे. गॅलमध्ये सामना सुरू असताना प्रेक्षकांमध्ये 'गारुडी' दिसला आणि त्याच्यासोबत साप आणि माकडही होतं. आता याचीच चर्चा सुरू झाली आहे.