
USA vs Oman ODI: Lowest Total Defended in History: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची जोरदार तयारी करत असताना त्यांचा ४० वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड आज मोडला गेला. भारताने १९८५ साली पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत हा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता आणि तो आज अमेरिकेच्या नवख्या संघाने स्वतःच्या नावावर केला. वन डे क्रिकेटमध्ये कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करण्याच्या विक्रम टीम इंडियाच्या नावावर होता.