

Vaibhav Sooryavanshi
esakal
VAIBHAV SOORYAVANSHI GETS AJINKYA RAHANE’S BIG ADVICE: भारतीय संघाचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी(VAIBHAV SOORYAVANSHI) सध्या आपल्या दमदार फलंदाजीमुळे सतत चर्चेत आहे. इंग्लंड दौऱ्यावर त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, सुरुवातीची मालिका त्याच्यासाठी फारशी खास ठरली नाही. पहिल्या तीन सामन्यांत त्याला १४, १३ आणि १५ धावाच करता आल्या. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका देखील केली.
पण त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यात वैभवने आपल्या बॅटनेच सगळ्यांना उत्तर दिलं. या मालिकेत त्याने ५०, २० आणि ८१ धावांच्या खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला मालिकाही जिंकता आली. त्यामुळे आता वैभव हा भारतीय क्रिकेटमधला भविष्यातील मोठा खेळाडू ठरू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.