

Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy 2026 live streaming details
esakal
Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy 2026 live streaming details: वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने २०२६ मध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आयपीएल २०२६ मध्ये ऑरेंज कॅप आपल्या नावावर केल्यानंतर वैभवला भारतीय टी-२० संघातही संधी मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याने भारताकडून पदार्पण केलं.
त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेतही त्याने आपल्या फलंदाजीची झलक दाखवत चाहत्यांची मनं जिंकली. आता पुन्हा एकदा वैभवला मैदानावर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. २३ ऑगस्टपासून दिलीप ट्रॉफी २०२६ला सुरुवात होणार आहे.