मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं... ! वैभव सूर्यवंशीने व्यक्त केल्या भावना; VVS Laxman अन् इशान किशन यांच्याबद्दल म्हणाला...

VAIBHAV SOORYAVANSHI: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकावीर आणि सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशीने आपल्या भावना व्यक्त केल्या. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, ईशान किशन आणि संपूर्ण संघाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्याने मनापासून आभार मानले.
VAIBHAV SOORYAVANSHI

VAIBHAV SOORYAVANSHI

esakal

Updated on

VAIBHAV SOORYAVANSHI SHARES EMOTIONAL REACTION AFTER WINNING PLAYER OF THE SERIES: भारतीय संघात निवड झाल्यापासून थेट मालिकावीर आणि सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने(VAIBHAV SOORYAVANSHI) आता आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ३-० अशी एकतर्फी मालिका जिंकली.

या मालिकेत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने तीन सामन्यांत १५१ धावा केल्या. दोन अर्धशतकं झळकावली आणि तिसऱ्या सामन्यात ४९ चेंडूत ८१ धावांची शानदार खेळी करत सामनावीर ठरला. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com